Language Expertise

मराठी लेखन व संपादन
२०२१ - २०२५

सुरुवातीपासूनच मराठी लेखनाची आवड. छंद म्हणून तो मी जोपासला आहे. लेखनाची सुरुवात साहजिकच शाळेत असताना आठव्या इयत्तेपासून झाली. निमित्त होतं विविध प्रकारच्या स्पर्धा, पण मराठीचे धडे वाचताना, किंवा अगदी चंपकसारखं साहित्य वाचताना ललित लेखन कसं केलं जातं याचं बाळकडू मिळत गेलं, घरी वडिलांच्या रूपाने लेखन क्षेत्रात एक उत्कृष्ट मार्गदर्शक होताच.

माझ्या या वाटेवरील पहिला आणि मैलाचा दगड म्हणजे इयत्ता नववीत असताना "दुष्काळ आणि जलसाक्षरता" या विषयावर लिहिलेल्या निबंधाला मिळालेलं राज्य स्तरावरील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. मग मात्र आपसूकच मराठी वाचन आणि लेखन हवंहवंसं वाटू लागलं, रणजित देसाईकृत श्रीमान योगी, संतांची चरित्रं, सावरकरांचं १८५७ चे स्वातंत्र्यसमर, आपण एकटेच आहोत का हे अंतराळ विषयावरील पुस्तक अशी पुस्तकं डोळ्याखालून काढली.

मध्यंतरी मोठा ब्रेक लागला. पण २०२१ पासून द पोस्टमन ब्लॉगसाठी विविध विषयांवर लेख लिहिण्याची संधी मिळाली. यावर माझे ३०० हून अधिक लेख आहेत. सध्या लेखनाची क्षेत्रं विस्तारण्यावर माझा भर आहे - स्क्रिप्ट लेखन, लहान कथानके लेखन, अहवाल लेखन इत्यादी.

द पोस्टमनबरोबर काम करताना माहितीपूर्ण लेखांबरोबर इतर प्रकारचे लेखन करण्याची संधी मिळाली.

विवेकानंद केंद्राबरोबर काम करताना या प्रकारचे लेखन करण्याची संधी मिळाली.

मराठी भाषेत अनुवाद
२०२२ - आतापर्यंत

लेखनाबरोबरच मराठी भाषांतराच्या क्षेत्रात देखील हातखंडा आजमावायचा ठरवला तो मास्टर डिग्रीच्या शेवटच्या वर्षी. तेव्हा विवेकानंद केंद्र शाखा पुणे साठी संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा निवेदितामाई भिडे यांचे पत्र त्यांच्या विविध उत्सवांच्या निमित्ताने येत असत.

त्यातील काही पत्रांचा अनुवाद करण्याचा अनुभव मला मिळाला. त्यातील एक पत्र या लिंकवर आहे.